Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Today India : कोरोनाचा धोक्यावर खबरदारीचा उपाय, महाराष्ट्रात कोविड लसीकरणात तीन पटीने वाढ; देशात 226 रुग्ण पॉझिटिव्ह
देशात गेल्या 24 तासांत 263 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या 3 हजार 653 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतातील कोरोनाची परिस्थिती दिलासादायक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका पाहता, महाराष्ट्रात नागरिकांनी लसीकरणाचा पर्याय निवडला आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील लसीकरणात तिपटीने वाढ झाली आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापूर्वी दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण 3000 होते, गेल्या आठवड्यात हे प्रमाण वाढून 10,000 हजारपर्यंत पोहोचले आहे.
येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढणार असल्याचा धोका व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्याचे तसेच कोरोना लस (Covid19 Vaccination) आणि बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीमध्ये तीन पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
जगभरात चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरताना दिसत आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली, तरी सरकारकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.
खबरदारी म्हणून केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे.
भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची रँडम कोविड चाचणी केली जात आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याआधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भारतातसाठी पुढचे 40 दिवस फार महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात नागरिकांनी योग्य खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा देशात पुन्हा कोरोनाची लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.