Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid 19 Updates : देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 2503 वर
ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे अमेरिका आणि चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरात ओमायक्रॉनच्या एक्सबीबी.1.5 (XBB 1.5 Variant) व्हेरियंट आणि बीएफ.7 व्हेरियंटचा (BF.7 Variant) उद्रेक पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात बीएफ.7 व्हेरियंटचे सात (BF.7 Variant) आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे (XBB 1.5 Variant) पाच रुग्ण आढळले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज देशात 288 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात XBB व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण आढळले असून आता देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण आहेत.
सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2503 वर पोहोचली आहे. काल देशात 188 रुग्ण आढळले होते, आज 288 रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्येत 100 रुग्णांची वाढ झाली आहे.
देशात आतापर्यंत 220 कोटीहून अधिक लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. सरकार लसीकरणावर अधिक भर देत आहे
आरोग्य विभागाकडून नागरिकांना लसीकरण आणि बूस्टर डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे.
देशात XBB.1.5 व्हेरियंटचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील XBB व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे.
छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये XBB व्हेरियंटच्या नवीन दोन रुग्णांची नोद झाली आहे. तर गुजरातमध्ये तीन आणि कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
एका रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यामध्ये चीनमध्ये सुमारे 40 टक्के नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारत सरकार अलर्टवर आहे. आरोग्य विभागाकडून कोविड चाचणी आणि लसीकरणावर भर दिला जात आहे.