Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : लसीकरणाचा 100 कोटी डोसचा प्रवास कसा होता? जाणून घ्या फोटोंच्या स्वरुपात....
देशात 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आणि आता 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट साध्य झाल्याचं पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
देशात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले.
भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.
देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
औरंगाबादचा बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि मुंबईतल्या सीएसएमटीला रोषणाई करण्यात आली आहे.
देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरं करण्यासाठी गायक कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केलं जात आहे.
हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसं की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे.