Project Cheetah : आफ्रिकन चित्ते कुनो अभयारण्यात दाखल, पंतप्रधानाच्या हस्ते चित्ते अभयारण्यात सोडणार
दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया येथून आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्त्यांना विशेष विमानानं नामिबियाहून 8000 किलोमीटरचा प्रवास करुन भारतात आणलं आहे.
चित्त्यांसाठी विमानामध्ये विशेष सुविधा करण्यात आली. चित्यांना सुरक्षित बॉक्समधून विमानानं भारतात आणलं. त्यांच्यासोबत नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं एक पथकही भारतात पोहोचलं आहे.
चित्त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येईल.
शुक्रवारी नामिबियाहून निघालेलं विशेष विमान शनिवारी सकाळी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर विमानतळावर पोहोचलं.
ग्वाल्हेरहून चित्त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आणण्यात आलं.
आता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या चित्त्यांना अभयारण्यातील त्यांच्या विशेष अधिवासात सोडण्यात येईल.
1952 साली नामशेष झालेला चित्ता हा प्राणी अखेर 70 वर्षानंतर भारतात परतला आहे.
आता या आफ्रिकन चित्त्यांना भारतातील हवामानाशी जुळवून घ्यावं लागणार आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.