PHOTOS | Mercedes-Benz E-Class चा नवा लूक... काय आहे नवे फीचर्स आणि किंमत
मर्सिडीज कार खरेदी करणे अनेकांचं स्वप्न आहे. मर्सिडीज कारमध्ये ई क्लास सर्वात अधिक विकली जाणारी लोकप्रिय कार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमर्सिडीजमध्ये ई क्लास कार अधिक अपडेट्ससह आल्या आहेत. ई क्लास मर्सिडीजचा लूक अधिक आकर्षक आहे. नव्या डिझाईनमध्ये हेडलॅम्प आणि एका फ्रंट बम्परचा समावेश आहे. तसेच एक टेल लॅम्पही देण्यात आला आहे. तसेच मर्सिडीजमध्ये नव्या रंगांचाही समावेश करण्यात आला आहे.
ई क्लासमध्ये MBUX इन्फोटेन्मेंट लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे. ही अलेक्सा आणि गूगल होमसोबत जोडली जाऊ शकते. या कारमध्ये बर्मास्टर ऑडियो सिस्टम, पॅनोरॉमिक सनरुफ, एअर सस्पेन्शन, सॉफ्ट क्लोज डोअर, 360 डिग्री कॅमेरा अशा सुविधांचा समावेश आहे.
मर्सिडीज ई क्लास कारमध्ये जागाही ऐसपैस मिळते. कारमध्ये हेडरुम आणि लेगरुम चांगला मिळतो. मागील सीटवर अनेक लग्जरी सिस्टम देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये सेंटर आर्मरेस्ट प्लस वायरलेस चार्जरचा समावेश आहे.
ई क्लासमध्ये E 200 petrol, E 220d and E 350d हे इंजिन प्रकार उपलब्ध आहेत. E350d मध्ये स्पोर्टियर AMG लाईन आहे आणि ही फ्लॅगशिफ ट्रिम आहे. E350d सर्वात शक्तीशाली ई क्लास 6 सिलेंडरसर डिझेल इंजिन आहे. E200 चार सिलेंडर वालं 197hp पेट्रोल इंजिन आहे. तर E200d चार सिलेंडरसह 194hp डिझेल इंजिन आहे. E200 कारसाठी 63.6 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर E350d AMG साठी 80.9 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. भारतात ई- क्लासचे 46000 हून अधिक युनिट्स विकले गेले आहेत.