Chandrayaan Landing On Moon : चंद्र दिसतो गोल पण गोल नाही, नेमका कसा आहे चंद्राचा आकार?
Chandrayaan Landing On Moon: चांद्रयान-3 आज म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर लॅण्डिंग करणार आहे. याद्वारे चंद्राबाबतच्या अनेक गोष्टी कळणार आहे. त्याआधी आपण चंद्राशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया, ज्यात त्याच्या आकाराचाही समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपृथ्वीवरुन चंद्राला पाहताना तो आपल्याला गोल आकाराचा दिसतो. चंद्र जरी अर्धा दिसत असला तरी त्याचा आकार हा गोलच आहे, हे आपल्याला कळतं. परंतु शास्त्रज्ञांच्या मते ही बाब खरी नाही.
बीबीसीच्या वृत्तानुसार, चंद्राचा आकार हा एखाद्या चेंडूप्रमाणे गोल नाही, तो फक्त गोल दिसतो.
आता प्रश्न असा आहे की चंद्राचा आकार नेमका कसा आहे. तर याचं उत्तर आहे की चंद्राचा आकार अंडाकार आहे, तो पूर्णत: गोल नाही.
आपण जेव्हा पृथ्वीवरुन चंद्र पाहतो तेव्हा आपल्याला त्याचा संपूर्ण भाग दिसत नाही आणि अंडाकार असतानाही तो गोल आकाराचा दिसतो.
चंद्रावर असलेले इम्पॅक्ट क्रेटर म्हणजे खोल खड्डे आतापर्यंत चार अब्ज वर्षांपूर्वी खगोलीय पिंडांची टक्कर झाल्यांने बनले आहेत.
चंद्राचा 59 टक्के भाग पृथ्वीवरुन दिसतो तर 41 टक्के भाग दिसत नाही.