Chandrayaan-3 : ...तर चांद्रयान-3 चं लँडिंग पुढे ढकलणार, 23 ऑगस्ट नाही 'या' दिवशी होण्याची शक्यता
23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी उतरणार आहे. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडर कॅमऱ्याद्वारे लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत एक मोठी माहिती दिली आहे. अनुकूल वातावरण नसल्याचं चांद्रयान-3 चं लँडिंग पुढे ढकलण्यात येईल.
लँडर मॉड्यूलशी संबंधित कोणतेही घटक प्रतिकूल दिसल्यास, 23 ऑगस्टला लँडिंग होणार नाही.
लँडिंगसाठी पोषक वातावरण नसल्यास लँडिंग 27 ऑगस्टला केलं जाईल, असं स्पेस अॅप्लिकेशन सेंटर-इस्रोने सोमवारी सांगितलं.
इस्रो-स्पेस अॅप्लिकेशन सेंटर अहमदाबाद-संचालक नीलेश एम देसाई यांनी सांगितलं की, लँडर मॉड्यूलचे आरोग्य आणि चंद्रावरील परिस्थिती लक्षात घेऊन लँडिंगबाबत निर्णय घेतला जाईल.
त्यांनी पुढे म्हटलं की, 23 ऑगस्ट रोजी, चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी, आम्ही लँडर मॉड्यूल आणि चंद्रावरील परिस्थितीच्या आधारावर त्यावेळी चंद्रावर उतरणे योग्य आहे की नाही याचा निर्णय घेऊ.''
जर कोणतेही घटक अनुकूल नसतील, तर आम्ही 27 ऑगस्ट रोजी मॉड्यूल चंद्रावर उतरवू. योग्य वातावरण असल्याच आम्ही 23 ऑगस्ट रोजी मॉड्यूल उतरवू शकू, असं संचालक देसाई यांनी सांगितलं आहे.
आता अवघ्या जगाच्या नजरा भारताच्या चंद्र मोहिमेकडे आहेत. इस्रोचं (ISRO Moon Mission) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे.
चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ जात आहे.