Chandrayaan 3 Landing : चांद्रयानची चंद्राशी ग्रेट भेट! इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये कशी सुरुय तयारी?
इस्रोकडून लँडिंगची तयारी पूर्ण झाली आहे. आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे चंद्रावर लँडिंग. (PC:ISRO)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे फोटो ट्विट करण्यात आला आहे. (PC:ISRO/PTI)
विक्रम लँडर मोड्युलला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5.44 पासून सुरू होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. (PC:ISRO/PTI)
त्यानंतर पुढे 20 मिनिटांनी टच डाऊन होणं अपेक्षित आहे. म्हणजेच 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल. (PC:ISRO/PTI)
विक्रम लँडरच्या सगळ्या सिस्टीम उत्तम पद्धतीनं काम करतायत अशी माहिती इस्रोनं दिली आहे. (PC:ISRO/PTI)
14 जुलै रोजी चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं. आता अवघ्या काही तासांत चंद्रावर तिरंगा फडकणार आहे. (PC:ISRO)
चांद्रयान-3 ने 14 जुलै 2023 पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. (PC:ISRO)
चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. (PC:ISRO)
यामध्ये यश मिळाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. त्यासोबत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरेल. अवघ्या जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे लागलं आहे. (PC:ISRO)
चांद्रयान-3 मध्ये लँडर आणि रोव्हर पाठवण्यात आला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करेल. (PC:ISRO/PTI)
नंतर विक्रम लँडरमधील रोव्हर तेथील पाण्याचे साठे शोधणे आणि चंद्रावरील माती आणि दगड यांची नमुने आणि इतर आवश्यक माहिती गोळा करेल. (PC:ISRO/PTI)
पृथ्वीवरून 14 जुलै रोजी निघालेलं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी चंद्रवर उतरेल. चांद्रयान-3 संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. (PC:ISRO/PTI)