उरले फक्त काहीच तास... चंद्रयान मोहीम यशाकरता बेळगावच्या दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात शतरुद्राभिषेक
इस्रोचं चांद्रयान-3 आज चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. जर भारताचं चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं, तर भारत इतिहास रचणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाची हीच चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देशभरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, अनेक मंदिरांमध्ये होम, हवन यज्ञ करुन देवाकडे साकडं घातलं जातंय.
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, म्हणून पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.
पहाटेपासून शतरुद्राभिषेक, विशेष रुद्र पठण आणि पंचामृत अभिषेक महादेवाला करण्यात आला.
या पूजेला भक्तांनी उपस्थित राहावं, असं मंदिरातर्फे आवाहन करण्यात आलं होतं.
या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते.
रुद्राभिषेक झाल्यावर महाआरती करण्यात आली.त्यानंतर चंद्रयान मोहीम यशस्वी होऊदे म्हणून सामूहिक प्रार्थना करण्यात आली.