Chandra Grahan: आज वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, मध्यरात्री 1.05 मिनिटांनी होणार सुरू
आज मध्यरात्रीपासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. मध्यरात्री 1 वाजून 05 मिनिटांपासून चंद्रग्रहण सुरु होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर 1 वाजून 44 मिनिटांनी सर्वाधिक ग्रहण होईल. यावेळी चंद्र 10 ते 12 टक्के ग्रस्तोदित असणार आहे.
परंतु साध्या डोळ्याने न दिसणारे छायाकल्प चंद्रग्रहण 3.56 वाजता संपणार आहे.
या चंद्रग्रहणावेळी चंद्रासोबत पृथ्वीच्याजवळ येत असलेल्या गुरू ग्रहाची युती दिसेल. तसंच आज होणारं ग्रहण या वर्षांतील शेवटचं चंद्रग्रहण असेल.
चंद्रग्रहणामुळे राज्यातील अनेक मंदिरात धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
चंद्रग्रहणामुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातील पूजेसह धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं असणार.
यावर्षीचं पहिलं चंद्रग्रहण हे 5 मे रोजी झालं होतं.