कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 2 बसचा भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू तर अनेकडण जखमी

कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. बस अपघातात 2 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

Bus Accident News

1/10
कुंभेळ्याहून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
2/10
यमुना एक्सप्रेस वेवर दोन बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 2 जण ठार झाले आहेत, 12 जण जखमी झाले आहेत
3/10
स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
4/10
कुंभमेळ्यातून भाविक परतत असताना हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
5/10
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातून भाविकांना घेऊन हरियाणा राज्यातील बल्लभगड येथे परतणाऱ्या पर्यटक बसने यमुना एक्सप्रेस वेवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांनी भरलेल्या डबलडेकर बसला मागून धडक दिली.
6/10
दोन वाहनांच्या झालेल्या या धडकेत टुरिस्ट बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.
7/10
पर्यटक बस HR38AH1818 प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यापासून आग्रा नोएडा यमुना एक्सप्रेसवे मार्गे हरियाणा राज्यातील बल्लभगडला जात होती, ज्यामध्ये 16 प्रवासी उपस्थित होते.
8/10
घटनेची माहिती मिळताच पोलिस घनास्थली दाखल झाले होते.
9/10
या अपघातात अनेकजण जखणी झाल्याची माहिती मिळत आहे.
10/10
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
Sponsored Links by Taboola