भाजप आणि संघाचे लोक माझे गुरू - राहुल गांधी
Bharat Jodo Yatra: भाजप आणि संघाच्या लोकांना मी माझा गुरू मानतो. कारण त्यांच्यामुळे राजकारण म्हणजे काय? हे समजले आहे, असा टोला राहुल गांधी लगावला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडलं.
माझी बदनामी करण्यासाठी आणि प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने हजारो कोटी खर्च केल्याचा आरोप राहुल गांधींनी (Rahul Gandhi)भाजपवर (BJP) केला आहे.
राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेवर भाजपकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे
माझी बदनामी करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले. याआधी मी यावर 99 टक्के विश्वास ठेवत होतो. मात्र आता मला 100 टक्के खात्री आहे की, भाजपने बदनामीसाठी हजारो कोटी खर्च केले.
मात्र सत्य लपविण्यासाठी कितीही खर्च करा किंवा कितीही कम्पियन चालवा, काहीही होणार नाही, असं यावेळी राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, माझ्यावर टीका करणाऱ्या आरएसएस आणि भाजपच्या मित्रांचे धन्यवाद.
भाजप आणि संघाच्या मित्रांना मी माझा गुरू मानतो. कारण त्यांच्यामुळे राजकारण म्हणजे काय? हे समजले आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावरील हल्ले सुरू ठेवावे.
भारत जोडो यात्रेत कोणी यावे हे प्रत्येकाने स्वत: ठरवावे. विरोधकांचे देखील या यात्रेत स्वागत आहे. इतर पक्षांनी देखील भारत जोडो यात्रेचे स्वागत केले आहे. अखिलेश, मायावती सहभागी झाले कारण आमचे विचार सारखे आहेत.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवर देखील राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, सरकारची इच्छा आहे की, मी भारत जोडो यात्रा बुलेट प्रुफ गाडीने करावी.. परंतु ते मला मान्य नाही. जेव्हा भाजपचे नेते रोड शो करतात तेव्हा कोणते पत्र लिहिले जात नाही. आणि आता म्हणतात की, राहुल गांधी नियमांचे उल्लंघन केले आहे.