बाबासाहेब आंबेडकरांनी 'या' तीन महान व्यक्तींना गुरु मानलं होतं

Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांनी तीन महान व्यक्तींना गुरु मानलं होतं? हे तीन जण कोण होते जाणून घेऊयात...

babasaheb ambedkar,

1/8
Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज (14 एप्रिल) देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
2/8
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला होता.
3/8
भारतात समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं.
4/8
भारतानंतर डॉ. आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आणि नंतर इंग्लंडमधील लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं.
5/8
"लोकशाही म्हणजे शासनाचा असा प्रकार होय की, ज्याद्वारे रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणले जातात", असं आंबेडकरांनी म्हटलं होतं.
6/8
दलित आणि शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि खासकरुन अस्पृश्यता निवारण करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात केली होती.
7/8
दरम्यान, अस्पृश्यता निवारणासाठी काम करत असताना डॉ. आंबेडकरांनी तीन महान व्यक्तींना गुरु मानलं होतं.
8/8
महात्मा फुले, संत कबीर आणि गौतम बुद्ध यांच्या समतेच्या विचारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभावित झाले होते.
Sponsored Links by Taboola