Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या सज्ज! कशी सुरु आहे तयारी? पाहा फोटोंमधून
Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात एक आठवडा अगोदर वैदिक विधींनी होईल. दरम्यान, रामलला मंदिराच्या बांधकामाची अनेक फोटो समोर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्विटरवर अयोध्येतील रामलला मंदिराच्या बांधकामाची नवीनत फोटो शेअर केले आहेत.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत, त्यासाठी अयोध्येत पार्किंगसह विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
श्रीरामललाच्या अभिषेक सोहळ्याला सुरुवात करणारे वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीला सुरू होतील. गेल्या आठवड्यात मंदिर ट्रस्टने 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली होती.
यासाठी रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी सर्व परंपरेतील मान्यवर संत आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना निमंत्रण मिळाले आहे. सहा ट्यूबवेल, एक स्वयंपाकघर आणि दहा खाटांचे रुग्णालय अशा अत्यावश्यक सुविधांनी युक्त तंबू येथे उभारण्यात आला.
रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशाच्या विविध भागांतील सुमारे 150 डॉक्टरांनी या रुग्णालयात एक-एक करून आपली सेवा देण्याचा संकल्प केला आहे. संपूर्ण शहरात कम्युनिटी किचनची स्थापना करण्यात येणार आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसांत राम भक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागांतून अयोध्येला 1,000 हून अधिक गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) 22 जानेवारीला रामललाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील नामांकित व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आली आहेत.
रामललाची सेवा करण्यासाठी पुजारी नियुक्त करण्यात आले. त्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली. या भरती प्रक्रियेसाठी देशभरातून 3000 वेदार्थी आणि पुजारी (Ram Mandir Priest) यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
त्यातून काहींची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामाची सेवा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आता निवड झालेल्या अर्चकांना 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार असून प्रशिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी देशभरातील तब्बल 3 हजार वेदार्थ्यांमधून काहीचीं निवड करण्यात आली आहे. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. पुजारी पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी 24 अर्चकांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 21 अर्चकांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे