देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे रचलेल्या सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताला 115 हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.
Continues below advertisement
Amit shah Veer savarkar statue andman
Continues below advertisement
1/8
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे रचलेल्या 'सागरा प्राण तळमळला' या अजरामर गीताला 115 हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.
2/8
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून आज 12 डिसेंबर रोजी पोर्ट ब्लेअर येथे 'सागरा प्राण तळमळला' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
3/8
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अँड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
4/8
याप्रसंगीत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या देशभक्तीच्या इतिहासाला उजळणी दिली. तसेच, तेव्हा देशासाठी लढता लढता बलिदान द्यावे लागते होते.
5/8
आता, देशासाठी मरण्याची नाही तर जगण्याची गरज आहे, देशभक्ती जपत देशासाठी योगदान दिलं पाहिजे, असेही अमित शाह यांनी येथील कार्यक्रमात बोलताना म्हटले.
Continues below advertisement
6/8
'व्हॅल्युएबल ग्रुप'चे संचालक अमेय हेटे यांची संकल्पना असलेला बियोदनाबाद येथील हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे.
7/8
पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा आणि इतिहासकार लेखक डॉ. विक्रम संपत, अभिनेते शरद पोंक्षे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
8/8
दरम्यान, अंदमानात वीर सावकर यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ घालवला आहे, असे म्हणत अमित शाहांनी वीर सावरकर यांच्या त्याग आणि बलिदानाची माहिती दिली.
Published at : 12 Dec 2025 06:41 PM (IST)