Amarnath Yatra 2023 Registration: अमरनाथला जाण्याचा विचार करताय? मग असं करा रजिस्ट्रेशन
अमरनाथ यात्रा 1 जुलै 2023 पासून सुरु होईल. आणि ही यात्रा 31 ऑगस्टला संपेल. म्हणजेच अमरनाथची यात्रा 62 दिवस चालणार आहे. या यात्रेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करु शकता
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांना पूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत. घरापासून ते पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना हवामानाची माहितीही दिली जाईल. श्री अमरनाथजी साइन बोर्डखाली सकाळी आणि संध्याकाळी आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला jksasb.nic.in वर जावे लागेल. याठिकाणी सर्वात आधी अर्ज भरा आणि नंतर तुमचा OTP टाका . आणि अर्जासह पुढे जा आणि तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती पाठविली जाईल.
यानंतर तुम्हाला पैसे भरावी लागतील. त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल परमिट मिळेल, जे तुम्ही डाऊनलोड करु शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ऑफलाईन रजिस्टेशन देखील करु शकता.
13 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्ती अमरनाथ यात्रेला जाऊ शकतात. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी नाही.
जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली तर तुम्हाला 100 ते 220 रुपये खर्च करावे लागतील. हेलिकॉप्टरच्या बुकिंगसाठी 13,000 रुपये मोजावे लागतील