Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Chhaava : असीरगड गावात अफवा पसरल्यानंतर दूरदूरवरून लोक खणण्यासाठी आले. व्हिडिओमध्ये शेकडो लोक रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात खोदताना दिसत आहेत.
Chhaava
1/12
मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा सध्या चर्चेत आहे. छावा चित्रपट पाहिल्यानंतरची ही घटना आहे.
2/12
बुरहानपूरच्या असीरगड गावात शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली आहे.
3/12
या अफवेनंतर शेकडो महिला, लहान मुले, पुरुष, वयोवृद्ध लोक रात्रीच्या वेळी शेतात आधुनिक उपकरणांसह खोदण्यासाठी पोहोचले.
4/12
याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वीही या परिसरात अशा अफवा पसरल्या आहेत.
5/12
मात्र, प्रशासनाच्या कठोरतेनंतर येथील उत्खनन बंद करण्यात आले. आता चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा लोक शेताकडे वळू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
6/12
असीरगडमध्ये ऐतिहासिक खजिना दडला असल्याची स्थानिक लोकांची धारणा आहे.
7/12
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, लोक दूरदूरवरून खोदण्यासाठी येत आहेत.
8/12
काही महिला मजुरांना येथे रस्ता बांधकाम करताना सोन्याची नाणी सापडली होती. यानंतर प्रशासनाने खोदकामावर बंदी घातली होती.
9/12
पुरातत्व तज्ज्ञांच्या मते, असीरगड हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे. येथे जुनी नाणी सापडण्याची शक्यता आहे. मात्र याठिकाणी सोन्याचा साठा असल्याची पुष्टी तपासानंतरच होऊ शकते.
10/12
असीरगड गावात अफवा पसरल्यानंतर दूरदूरवरून लोक खणण्यासाठी आले. व्हिडिओमध्ये शेकडो लोक रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात खोदताना दिसत आहेत.
11/12
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, छावा चित्रपटात बुरहानपूरच्या असीरगढचे नाव आल्यानंतर दूरदूरवरून लोक सोन्याची नाणी शोधण्यासाठी येत आहेत.
12/12
येथे काही नाणी आधीच सापडली आहेत, काही लोकांना पितळेची नाणी सापडली आहेत ज्यावर उर्दू आणि अरबीमध्ये काहीतरी लिहिलेले आहे. जे मुघल काळातील दिसते.
Published at : 08 Mar 2025 01:04 PM (IST)
Tags :
Chhaava