Aadhaar Card : आधार कार्ड अपडेट करायचंय? मग 'ही' माहिती नक्की वाचा
Aadhaar Card Update: आधार कार्ड (Aadhaar Card) म्हणजे, महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक. आधार कार्ड नसेल तर अगदी बँकेच्या कामांपासून अनेक कामांचा खोळंबा होतो. आधार कार्ड सर्वच महत्त्वाच्या कामांसाठी लागतंच. अशातच आधार कार्डावर जन्मतारिखही योग्य असणं आवश्यक असतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर आधार कार्डावरील जन्मतारिख चुकली असेल तर तुम्हाला मोठा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जर तुमच्याही आधार कार्डावर जन्मतारिख चुकली असेल तर लगेचच अपडेट करुन घ्या.
अगदी सहज सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही हे काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्याही तुम्ही तुमच्या आधार कार्डावरील जन्मतारिख अपडेट करु शकता.
तुम्ही UIDAI ची ऑफिशियल वेबसाईट uidai.gov.in मार्फत आपल्या आधार कार्डावरील जन्म तारिख बदलू शकता. परंतु, त्यासाठी काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. जाणून घ्या तुम्ही किती वेळा आधार कार्डावरील जन्मतारिख बदलू शकता त्याबाबत...
तुम्ही तुमचं नाव केवळ 2 वेळा बदलू शकता. तसेच तुमची जन्मतारिख एकदाच बदलू शकता. याव्यतिरिक्त पत्ता, फोटो आणि मोबाईल नंबरसाठी तुम्ही कितीही वेळा बदलू शकता.