HSC Exam: 12वीच्या गणिताच्या पेपरला मास कॉपी! खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रकार उघड, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

HSC Exam: छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श सेकंडरी स्कूल पिंपळगाव वळण, फुलंब्री या ठिकाणी परीक्षा केंद्रावर मास कॉपी सुरू आल्याचं खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी उघड केलं आहे.

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar news

Continues below advertisement
1/7
छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श सेकंडरी स्कूल पिंपळगाव वळण, फुलंब्री या ठिकाणी परीक्षा केंद्रावर मास कॉपी सुरू आल्याचं खुद्द जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी उघड केलं आहे.
2/7
12वी चा आज गणिताचा पेपर होता. त्यावेळी हा सगळा प्रकार सुरू होता. या सर्व कॉप्या अधिकारी विकास मीना यांच्या पथकाने जप्त केल्या आहेत.
3/7
जेव्हा मी आतमध्ये आलो तेव्हा या केंद्रावर अनेक जण कॉपी पुरवत असल्याचे निदर्शनास आले. जेवढ्या कॉपी येथे आढळल्या त्या संस्थेतीलच लोक पुरवत असल्याचे समजत आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.
4/7
खूप मोठे प्रमाणात कॉपी करण्याचे प्रमाण या ठिकाणी निदर्शनास आले असल्याचे ही विकास मीना म्हणाले.
5/7
एक दोन कॉपी आढळल्या असत्या तर समजू शकलो असतो. मात्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू असल्याचं आढळून आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत.
Continues below advertisement
6/7
संस्थाचे मान्यता रद्द करण्याची देखील कारवाई आपण सुरू करणार आहोत, असेही जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले.
7/7
या परीक्षेत अशाप्रकारे कॉपी होणार नाही म्हणून आम्ही अधिकारी प्रत्येक परीक्षेला या केंद्राव पथके पाठवू. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Sponsored Links by Taboola