Aadhaar Address Update : चार सोप्या स्टेप्समध्ये अपडेट करा तुमचा आधारकार्डवरचा पत्ता; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

आधार कार्डमध्ये आपला पत्ता अपडेट ठेवणे आवश्यक आहे. काही अतिशय सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही आधारमध्ये तुमचा पत्ता बदलू शकता.

आधार

1/10
आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे आणि महत्त्वाचे कागदपत्र आहे.
2/10
जवळपास प्रत्येक सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. अशा स्थितीत जर तुमचा आधार कार्डमध्ये अचूक पत्ता नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
3/10
तुमच्यापैकी बरेच जण भाड्याच्या घरात राहत असतील. त्यामुळे वारंवार पत्ता अपडेट करावा लागतो.
4/10
आधार कार्डमध्ये आपला पत्ता अपडेट ठेवणे आवश्यक आहे. काही अतिशय सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही आधारमध्ये तुमचा पत्ता बदलू शकता.
5/10
आधारमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी, प्रथम तुम्हाला त्याच्या uidai.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
6/10
यानंतर तुम्हाला My Aadhar च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
7/10
दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला Update Your Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या आधारमधील अपडेट अॅड्रेसच्या पर्यायावर जावे लागेल.
8/10
त्यानंतर तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
9/10
तिसर्‍या चरणात, तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला पत्ता बदलण्याचा पर्याय दिसेल. चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही या पर्यायावर क्लिक करून तुमचा पत्ता अपडेट करू शकता, मात्र त्यासाठी तुम्हाला अॅड्रेस प्रूफ जोडावा लागेल.
10/10
चौथ्या टप्प्यात तुम्हाला ५० रुपये सेवा शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पावती मिळेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 24 तासांत तुमचा पत्ता तुमच्या आधारमध्ये अपडेट केला जाईल.
Sponsored Links by Taboola