Aadhaar Pan Link: आजच पॅन-आधार लिंक करा, नाहीतर 10 हजारांचा दंड भरावा लागेल; जाणून घ्या लिंकिंग प्रक्रिया!
आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जवळपास प्रत्येक सरकारी सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड द्यावे लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचप्रमाणे बँकेत ५० हजारांहून अधिक पैसे जमा करण्यासाठी आणि आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. तुम्ही पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक न केल्यास तुमचा पॅन अवैध मानला जाईल. अशा स्थितीत तुम्हाला मोठा दंडही ठोठावला जाईल.
आधार अवैध असल्यास 10 हजार रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो.
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. त्यापूर्वी, लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड लिंक न केल्यास ते रद्द मानले जाईल.याचा अर्थ तुम्ही ते कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात पुन्हा वापरू शकणार नाही.
जाणून घ्या लिंकिंग प्रक्रिया - सर्व प्रथम, जर तुमचे खाते तयार झाले नसेल तर प्रथम स्वतःची नोंदणी करा. यानंतर तुम्हाला आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फायलिंग वेबसाइटवर जावे लागेल.
दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला वेबसाइटवर आधार लिंकचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लॉगिन करा आणि तुमच्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा.
तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला प्रोफाइल सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय दिसेल, तुम्हाला तो निवडावा लागेल. येथे तुम्हाला दिलेल्या विभागात तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
माहिती भरल्यानंतर खाली दाखवलेल्या 'Link Aadhaar' पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा आधार लिंक होईल.