Aadhaar card: नवजात मुलांचे Baal Aadhaar Card बनवायचंय? ही कागदपत्रे आहेत जरुरी!
भारतात आधार कार्डची गरज लक्षात घेऊन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नवजात मुलांसाठी देखील आधार कार्ड जारी करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधार कार्डाशिवाय मुलांना अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते.
भारत सरकार ५ वर्षांखालील मुलांना निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड जारी करते.
देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ही सुविधा आधीपासूनच आहे, जेव्हा मुले जन्माला येतात, तेव्हाच त्याचे आधार कार्ड बनवले जाते.
जर तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे राहिले असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रात किंवा अंगणवाडीत जाऊन मुलाचे कार्ड बनवू शकता.
तुम्ही तिथे जाऊन आधारसाठी ऑनलाइन अर्जही करू शकता. मुलासाठी आधार तयार करण्यासाठी तुम्हाला नावनोंदणी फॉर्म भरावा लागेल. यासह काही कागदपत्रे आवश्यक असतील.
UIDAI 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड जारी करते. हे कार्ड पाच वर्षांसाठी वैध आहे. त्यानंतर ते अपडेट करावे लागेल.
आधार कार्ड मुळात एखाद्या व्यक्तीचे बायो-मेट्रिक्स (फिंगरप्रिंट) आणि बुबुळ (रेटिना स्कॅन) स्कॅन करून 12 अंकी ओळख क्रमांक प्रदान करते परंतु नवजात मुलाचे किंवा 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे बोटांचे ठसे आणि बुबुळ पूर्णपणे विकसित झालेले नसतात. म्हणून UIDAI ने मुलांसाठी चाइल्ड आधार कार्ड ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
यासाठी, तुम्हाला मुलाचे जन्म प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त शाळा ओळखपत्र किंवा फोटो ओळखपत्र आवश्यक आहे.
परंतु ते नसल्यास, पालकांपैकी एकाचे आधार कार्ड आवश्यक असेल. (सर्व फूट सौजन्य : गुगल)