Aadhaar card Name Change: आधार कार्डवर चुकीचे नाव छापलं गेलंय? या तीन सोप्या स्टेप्स फॉलो करून बदलून घ्या!
आधार कार्ड हे आजच्या काळात आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक आवश्यक कागदपत्र बँकेत नेऊन आधार लिंक करणे जवळपास अनिवार्य झाले आहे. याशिवाय जवळपास सर्व शासकीय सुविधांसाठी ते सक्तीचे करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत जर तुमचे नाव आधारवर चुकीच्या पद्धतीने छापले गेले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
अनेक ठिकाणी तुमची ओळख पडताळून पाहण्यासाठी आधार कार्डचाही वापर केला जातो. अशा परिस्थितीत आधारवर चुकीचे नाव छापल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नाव चुकीचे छापले तर अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते.
जर तुमचे नाव तुमच्या आधारमध्ये चुकीच्या पद्धतीने छापले गेले असेल, तर तुम्ही घरी बसल्या काही सोप्या ऑनलाइन स्टेप्स फॉलो करून ते अपडेट करू शकता.
आधार कार्डमधील नाव अपडेट करण्यासाठी, प्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल.
यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल. होम पेजवर तुम्हाला आधार अपडेट या पर्यायावर जावे लागेल.
येथे तुम्हाला दिलेल्या पर्यायातून Update Demographic Data Online वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला नवीन पेजवरील Proceed to Update Aadhaar या पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर नवीन पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागेल आणि Send OTP वर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP मिळेल, जो तुम्हाला भरावा लागेल आणि लॉग इन करावे लागेल.
तिसर्या स्टेपमध्ये, तुम्हाला डेमोग्राफिक डेटा अपडेट करा वर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील, तुम्हाला जे काही सुधारायचे आहे त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला नाव सिलेक्ट करून Proceed बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला होय मला याची माहिती आहे यावर क्लिक करावे लागेल.