PHOTO : एसटीचं तिकीट बुक करायचंय? जाणून घ्या सर्वात सोप्पी पद्धत!

तिकीट बुक करण्यासाठी किंवा एसटीचं वेळापत्रक पाहण्यासाठी MSRTCने एक अॅप उपलब्ध करून दिलं आहे.

msrtc

1/10
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सोप्या पद्धतीने तिकीट बुक करण्यासाठी MSRTC नावाचं अॅप उपलब्ध करून दिलं आहे जे तुम्ही अॅपस्टोअर मधून डाऊनलोड करू शकता.
2/10
तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अॅप डाऊनलोड करायचे आहे. व त्यात लॉगिन करायचे आहे.
3/10
तुम्हाला वारंवार तिकीट बुक करायचे नसल्यास तुम्ही गेस्ट लॉगिन सुद्धा करू शकता.
4/10
लॉगिन नंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बसने प्रवास करायचा आहे ते सिलेक्ट करावं लागेल.
5/10
त्यानंतर लगेचच तुमच्या फोन वर उपलब्ध असलेल्या बसची यादी दिसेल.
6/10
सोर्स मध्ये तुम्हाला जिथून निघायचे आहे त्या ठिकाणचे नाव टाकावे तसेच डेस्टिनेशनमध्ये तुम्ही पोहचायचे असलेल्या ठिकाणाचे नाव टाकावे व सर्च बस या ऑप्शनवर क्लिक करावे.
7/10
तुमच्या वेळेला मॅच होणारी बस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचा रूट, बस टाईप आणि प्रवासाची तारीख दिसेल.
8/10
तुम्ही या अॅप वरून तुम्हाला हवी असलेली सीटसुद्धा सिलेक्ट करू शकता. लाल रंगात दिसणाऱ्या खुर्च्या आधीच बुक झालेल्या असतात, तर निळी कॉलर असलेल्या खुर्च्या फक्त महिलांसाठी राखीव असतात. यात तुम्हाला खाली तिकीटाची किंमतही दिसेल.
9/10
पुढे जावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक तसेच प्रवाश्याचे तपशील भरावे लागतात.
10/10
डिटेल्स भरल्यावर तुम्हाला पे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. पेमेंट साठी UPI, नेट बँकिंगसह अनेक पर्याय उपल्ब्ध आहेत. पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे तिकीट डिस्पले होईल. तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
Sponsored Links by Taboola