UTS App ticket booking : जाणून घ्या यूटीएस मोबाइलवर तिकीट कसे बुक करावे..
UTS On Mobile अॅप Android साठी Google Play आणि iPhone साठी App Store वर उपलब्ध आहे. तुम्ही घरी बसून जनरल तिकीट कसे सहज बुक करू शकता ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टेप 1: सर्वप्रथम, तुम्हाला मोबाइल अॅपवर UTS ला GPS परवानगी द्यावी लागेल. असे केल्याने, तुम्ही तुमच्या शहरापासून म्हणजेच १० किलोमीटरच्या अंतरात तिकीट बुक करू शकाल.
स्टेप 2: मोबाइल अॅपसाठी UTS वर नाव, मोबाइल नंबर आणि इतर आवश्यक मूलभूत माहिती प्रदान करावी लागेल.
स्टेप ३: नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP (वन टाइम पासवर्ड) पाठवला जाईल.
स्टेप 4: नोंदणी केल्यानंतर, तुमचा आयडी आणि पासवर्ड यूटीएस ऑन मोबाइल अॅपसाठी तयार केला जाईल. हा आयडी, पासवर्ड वापरून तुम्ही अनारक्षित रेल्वे तिकीट बुक करू शकता.
रेल्वे तिकीट बुक करण्यासाठीच्या यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपमध्ये अनेक प्रवासी तिकीट बुक करतात.
रेल्वेच्या तिकीट घराच्या खिडकीवर लांबच लांब रांग लावण्यापेक्षा लोक ऑनलाईन तिकीट बुक करणं पसंत करतात.
यासाठी यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपचा वापर केला जातो.
मात्र, या ॲपलाही काही मर्यादा होत्या. त्यामुळे बहुतेक वेळा तिकीट बुक करताना प्रवाशांना अडथळे येत होते.