Mahashivratri 2023: 'बम बम भोले'च्या गजरात औंढा नागनाथ नगरी दुमदुमली; महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
आज महाशिवरात्री... देशभरात महाशिवरात्रीसाठी भाविक विविध तीर्थस्थळावर दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानी असलेलं ज्योतिर्लिंग म्हणजे, श्रीक्षेत्र औंढा नागनाथ.
महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात असलेलं हे ज्योतिर्लिंग असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान.
आज महाशिवरात्रीनिमित्त रात्रीपासूनच भाविकांनी भगवान शंकराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीच्या यात्रा या महोत्सवाला सुरुवात झाली.
शनिवारी रात्री साडेबारा वाजता कळमनुरी विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करुन महापूजा पार पडली.
रात्री दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं.
रात्रीपासूनच हजारो भाविकांनी भगवान शंकराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
मध्यरात्रीपासून नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला होता.
भाविकांची गर्दी लक्षात घेता गर्भगृहातील अभिषेक दिवसभर बंद ठेवण्यात आला होता.