अचानक वावरातून धावत आले, कृषिमंत्र्यांच्या गाडीसमोर धडकले; शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Continues below advertisement
Hingoli farmers protest agriculter minister
Continues below advertisement
1/8
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करावा, शासनाने त्वरीत पंचनामे करावे अशी मागणी जोर धरत आहे.
2/8
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज हिंगोली दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ताफा रोखून आपला निषेध व्यक्त केला.
3/8
ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कृषीमंत्र्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावर उतरत काळे झेंडे दाखवले. कृषिमंत्री दत्ता भरणे येत असल्याची माहिती मिळताच त्यांचा ताफा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीत अडवला आहे.
4/8
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा ताफा अडवत त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
5/8
हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरामध्ये जोरदार पावसाने शेतीच नुकसान झालेलं आहे, शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी आहे त्यामुळे राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागमी राज्यभर जोर धरत आहे.
Continues below advertisement
6/8
ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी हिंगोली वाशिम महामार्गावरील कान्हेरगाव गावाच्या शिवारामध्ये लपून बसले होते.
7/8
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा येत असल्याचे पाहून शिवसैनिकांनी गनिमी कावा करत थेट रस्त्यावर उभे राहून गाड्या अडवल्या, त्यानंतर कृषिमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
8/8
दरम्यान, ऐनवेळी अशा पद्धतीने शिवसैनिकांनी कृषिमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्यामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांची सुद्धा चांगलीच तारांबळ झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
Published at : 20 Sep 2025 04:44 PM (IST)