Hingoli News: तापलेल्या तव्यानंतर आता विहिरीतील पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत
गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोलीतील हा बाबा हात पाय न हलवता पाण्यावर तरंगतोय.
अनेक जण याला चमत्कार समजून बाबाच्या दर्शनाला येत आहेत.
दुर्गसावंगीतल्या सिरसम येथे भागवत सप्ताह सुरू आहे.
हातपाय न हलवता पाण्यावर तरंगू शकतो असा दावा या महाराजांनी केलाय आणि हे पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
14 महिने उपवास आणि देवाचं नामस्मरण केल्यानं हे शक्य झाल्याचा दावा संबंधित बाबांनी केला आहे.
दरम्यान या प्रकरणावर अंनिसने मात्र आक्षेप घेतला आहे.. अंनिस आज या बाबाची पोलखोल केली जाणार आहे.
मात्र हा एक योगाचाच प्रकार असून आपल्या फुप्फुसामध्ये एकदा हवा भरली (मोठा श्वास घेतला) की आपले शरीर पाण्यावर संतुलित करू शकतो, असा काहींनी दावा केला आहे
विहिरीतला हा प्रकार नेमका काय आहे हे लोकांना दाखवून दिलं जाईल असं आव्हान अंनिसने दिलंय.
हिंगोलीतील या बाबाची पंचक्रोशीत चर्चा आहे