Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंचं दर्शन, शिवजयंतीनिमित्त बॅनरबाजी
हिंगोलीमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती देणारे फ्लेक्स हिंगोली शहरात लागले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणतेही महापुरुषाची जयंती म्हटले की नेते त्यांचे कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांचे फ्लेक्स बॅनरबाजी पाहायला मिळते.
मात्र, हिंगोलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध घटनांसंदर्भातील बॅनरबाजी करण्यात आली आहे.
हिंगोली शहरातील पुतळा परिसरामध्ये अनेक मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. शिवजयंती महोत्सव समितीकडून हा विशेष उपक्रम लावण्यात आला आहे.
19 फेब्रुवारी रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर सज्ज झालं आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांच्या आयुष्य आणि इतिहास यांची माहिती देण्याचा प्रयत्न याच फ्लेक्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
यासाठी खास जळगाववरून फ्लेक्स प्रिंट करून मागवण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
तसेच, शहरात लावण्यात आलेल्या मोठ्या फ्लेक्सच्या माध्यमातून जगातील विचारवंतांनी शिवाजी महाराजांच्या विषयी काय गौरव उद्गार लिहिलेले आहेत.
जागोजागी हे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत. यामुळे नागरिकांना इतिहास बॅनरच्या माध्यमातून पाहता येणार आहे.