'हर हर महादेव'चा जयघोष; नागनाथ मंदिरातील रथोत्सवाला भक्तांची गर्दी
Hingoli : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
Continues below advertisement
राज्यभरात मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने महाशिवरात्र साजरी करण्यात आली.
Continues below advertisement
1/9
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरत असते.
2/9
महाशिवरात्री नंतर चंद्रोदयाच्या दिवशी दरवर्षी औंढा नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव साजरा केला जातो.
3/9
हा रथोत्सव म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो
4/9
या रथोत्सवाचे दृश्य डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागनाथ भक्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये दाखल होत असतात.
5/9
मंदिरात दाखल झालेले भक्त या रथाला हाताने ओढत मंदिराला पाच प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यानंतर हा रथोत्सव संपन्न होत असतो.
Continues below advertisement
6/9
यावर्षी सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी मंदिरामध्ये शेकडो नागनाथ भक्तांची गर्दी झाली होती.
7/9
दरम्यान पोलिसांचा सुद्धा कडेचोट बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.
8/9
कोविड निर्बंध हटल्यानंतर मोठ्या उत्साहात हा रथोत्सव साजरा करण्यात आला.
9/9
राज्यभरात मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने महाशिवरात्र साजरी करण्यात आली.
Published at : 21 Feb 2023 11:17 PM (IST)