Hot Summer : गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाढला उन्हाचा तडाखा
उन्हाचा तडाखा एवढा वाढला आहे की, लोक पाण्यासाठी वणवण करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोजची दोन वेळची भूक भागवण्यासाठी उन्हाळा असो किंवा पावसाळा आपले रोजचे काम करत आहेत. वाढते तापमान पाहता ऊन्हापासून संरक्षण करण्यासाठी चेहऱ्याला रुमाल बांधून काम केले जात आहे.
तापमानाचा पारा वरचे वर वाढत असल्याने देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी गार पाणी मोठ्या प्रमाणावर प्यायलं जात आहे.
देशभरात गेल्या काही दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत असून अगदी प्राणी सुद्धा या वाढत्या तापमानाचे बळी ठरत आहेत.
दुपारच्या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी प्राणी झाडाच्या आडोशाला बसताना दिसत आहेत.
उन्हाचा कहर प्रचंड वाढत असल्याने डोके आणि चेहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी स्कार्फ अथवा रुमालचा वापर केला जातोय. तरुणीही घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने स्वत:चा चेहरा झाकत आहेत.
रणरणत्या उन्हाळ्यात दुपारच्या उन्हापासून थंडावा मिळण्यासाठी लहान मुले पाण्यात भिजून मस्त धमाल करताना दिसत आहेत.
उन्हाच्या झळा वाढल्याने गावागावांतील महिला आईस्क्रीम खाताना दिसत आहेत.