चिपळूणमध्ये काचेच्या बाटलीच्या टोकावर संपूर्ण शिल्प उभारलं, किंमत ऐकून थक्क व्हाल...!
कोकणातील अग्रगण्य चित्र शिल्प कला महाविद्यालय सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे येथे जेष्ठ चित्रकार व शिल्पकार सदानंद बाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्त बाकरे यांनी सावर्डे आर्ट महाविद्यालयात साकारलेले एक लाकडी कास्ट शिल्प प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिसायला एकदम साधे पण कलाकाराने आपल्यातील कलाविष्काराने साकारुन एका रिकाम्या काचेच्या बाटलीच्या टोकावर संपूर्ण कास्ट शिल्प बॅलेंन्स ठेवले आहे.
ते कितीही हाताने हलविले तरीही त्याचा बॅलेंन्स जात नाही..
पण विशेष म्हणजे या शिल्पाची किंमत एक लाख नव्हे दहा लाख नव्हे तर तब्बल ९९ लाख ९९ हजार ९९९ रुपये आहे म्हणजेच जवळपास एक कोटीच्या घरात आहे.
सावर्डे सारख्या ग्रामीण भागात हे कला दालनात हे शिल्प साकारल्यामुळे आणि या शिल्पाची एवढी महाग असल्याने बघ्यांची गर्दी येथे पहायला मिळते..
या शिल्पाबरोबरच अनेक वेगवेगळी शिल्प साकारलेली या कला दालनात पाहायला मिळतात..
या शिल्पाबरोबरच येथे सावर्डे परिसरातील ग्रामीण भागातील निसर्ग चित्र इथल्या विद्यार्थीनी रेखाटलेली आपल्याला पाहायला मिळतात..
कलाकाराच्या कलेतून साकारलेली शिल्पाकृती हि विचारकरण्यासारखीत आहे..