Gondia Hazara Fall : पर्यटकांना खुणावतोय गोंदियातील हाजरा फॉल...
गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल हे स्थळ तीन राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहाजरा फॉल हा महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात आहे.
हे स्थळ मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर जंगलाने वेढलेले आहे.
निसर्गाच्या सुंदर कुशीत उंच डोंगरावरुन कोसळणारे पाणी आणि तिथे गेल्या दोन वर्षांपासून सुरु करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण आहे.
इथे येणारे पर्यटक झिप लाईन, ब्रह्मा ब्रिज, मल्टीवाईन ब्रिज, वीसेफ ब्रिज, कमांडो झीक-झॅक बॅलन्स, हँगिंग ब्रिज, सीसॉ बॅलन्स, झार्क बाल यांसारख्या साहसी खेळांचा आनंद लुटतात.
जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असते.
इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केले, म्हणून त्याला हाजरा फॉल असे नाव पडले आहे.
इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
तर सुरक्षेसाठी प्रशिक्षित तरुण आणि तरुणींना इथे तैनात करण्यात आलं आहे.