Kashi Vishwanath : काशी विश्वनाथाच्या इतिहासाची पाने उलटूया, पाहूया 200 वर्षांपूर्वीची काशी!
kashi
1/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजे सोमवार, 13 डिसेंबर रोजी काशी विश्वनाथ कॉरीडॉरचं लोकार्पण केले. या निमित्ताने काशी विश्वनाथाच्या इतिहासाची पाने उलटूया, पाहूया 200 वर्षांपूर्वीची काशी. (photo credit : KanchanGupta/Twitter)
2/10
जगातील सर्वात जुने जिवंत शहर म्हणून #वाराणसी ओळखलं जातं, जे आता सतत बदलत आहे आणि विकसित होत आहे. (photo credit : KanchanGupta/Twitter)
3/10
ज्येष्ठ पत्रकार कांचन गुप्ता यांनी वाराणसीच्या इतिहासातील काही खास चित्रे ट्विटरद्वारे शेअर केले आहेत. (photo credit : KanchanGupta/Twitter)
4/10
ही चित्रे 19व्या शतकाच्या सुरुवातीची आहेत, जी लिथोग्राफवर छापलेली आहेत. (photo credit : KanchanGupta/Twitter)
5/10
कलाकार जेम्स प्रिन्सेप यांनी 19व्या शतकाच्या दुसर्या तिमाहीत #वाराणसीच्या घाटांची आणि #बनारसमधील जीवनाची परिश्रमपूर्वक नोंद केलीये. (photo credit : KanchanGupta/Twitter)
6/10
जेम्स प्रिन्सेपच्या या लिथो प्रिंट्समध्ये दाखवल्याप्रमाणे, 19व्या शतकाच्या सुरुवातीला #वाराणसी खूप वेगळे दिसत होते. (photo credit : KanchanGupta/Twitter)
7/10
औरंगजेबाच्या आदेशानुसार 17व्या शतकात मुघल सैन्याने विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केले. (photo credit : KanchanGupta/Twitter)
8/10
हल्ल्यादरम्यान, मुघल सैन्याने मंदिराच्या बाहेर स्थापित केलेली विशाल नंदीची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले. (photo credit : KanchanGupta/Twitter)
9/10
मंदिर पाडल्यानंतर 125 वर्षापर्यंत विश्वनाथ मंदिर नव्हते. (photo credit : KanchanGupta/Twitter)
10/10
यानंतर 1735 मध्ये इंदूरच्या महाराणी देवी अहिल्याबाईंनी काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी करून घेतली. (photo credit : KanchanGupta/Twitter)
Published at : 13 Dec 2021 04:51 PM (IST)