Gautami Patil Car Accident Pune : गौतमीला पुणे पोलीसांकडून क्लीन चीट, अपघातावेळी गौतमी गाडीत नव्हती...

Gautami Patil Car Accident Pune : गौतमी पाटील ही पुण्यातील एका अपघातामुळे अडचणीत आली होती. गौतमीच्या कारच्या चालकाने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी.

Gautami Patil Car Accident Pune

1/10
Gautami Patil Pune Car Accident: पुण्यातील नवले उड्डाणपुलाच्या परिसरात झालेल्या अपघात प्रकरणामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला क्लीन चिट मिळाली आहे. पोलीस तपासात अपघाताच्यावेळी गौतमी पाटील ही गाडीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
2/10
गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती.
3/10
पुणे पोलिसांच्या तपासातून गौतमी पाटील अपघातावेळी गाडीत नव्हती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून गौतमी पाटील हिला क्लीन चिट मिळाली आहे.
4/10
यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला. या रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
5/10
अपघाताच्यावेळी गौतमी पाटील गाडीत होती की नाही, हे तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 100 सीसीटीव्हींचे फुटेज पडताळले.
6/10
त्यामध्ये अपघातावेळी गौतमी पाटीलचा वाहनचालक हाच फक्त कारमध्ये उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
7/10
गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करताना चालढकल केली जात आहे, असा आरोपही झाला होता. तर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या होत्या.
8/10
तर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या होत्या.
9/10
त्यामुळे हे प्रकरण प्रचंड तापले होते. या अपघात प्रकरणात गौतमी पाटील हिला शुक्रवारी नोटीस धाडली होती.
10/10
तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या सगळ्या तपासानंतर पोलिसांकडून आता गौतमी पाटील हिला क्लीन चिट देण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola