Ganesh Utsav 2022 : 75 हजार दिव्यांनी साकारले 'बाप्पा'
अमृतमहोत्सव आणि लाडक्या गणपती बाप्पाची आगमन म्हणून 75 हजार दिव्यांनी साकारले बाप्पा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. यांची सांगड घालत प्रसिद्ध मोजेक कलाकार चेतन राऊत यांनी 75,000 मातीच्या पणत्यापासून कलेचे दैवत लाडके गणपती बाप्पा यांची प्रतिमा साकारली आहे.
हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी त्यांना २ दिवसांचा कालावधी लागला आहे.
12 सहकाऱ्यांसोबत हे पोर्ट्रेट साकारले आहे.
50 फूट लांब x 40 फूट रुंद आकाराचे पोर्ट्रेट साकारण्यासाठी 6 रंगाच्या छटा असलेले दिवे वापरले आहेत.
पवई मधील समाजसेवक चंदन चित्तरंजन शर्मा यांच्या प्रयत्नाने हे पोर्ट्रेट साकारण्यात आहे.
20 ऑगस्ट पर्यंत कला प्रेमींना पाहायला मिळणार आहे.
तसेच भारतातील हे पाहिले श्री गणेशा चे दिव्यापासून साकारलेले पोर्ट्रेट म्हणून याची जागतिक विविध रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात येणार असल्याचे कलाकार चेतन राऊत यांनी सांगितले.