Gadchiroli ST Bus Accident : गडचिरोली : एसटी बसची झाडाला धडक; 10 शालेय विद्यार्थ्यांसह 22 जण जखमी
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील आयपेठा गावाजवळील महामार्गावर एसटी बस झाडावर धडकली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना 1 मार्च 2023 रोजी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान घडली.
आसरअल्ली येथून प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांना घेऊन सिरोंचाकडे एसटी बस जात होती.
ही एसटी आयपेठा गावाजवळील महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन धडकली.
एसटी बसने दिलेली धडक अतिशय भीषण होती.
या अपघातात एसटीचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये 12 प्रवासी व 10 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जखमींना अंकिसा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेचा पुढील तपास आसरअल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी अधिकारी राजेश गावडे करीत आहेत.