Winter fruit: हिवाळ्यात पाणी कमी पिऊनसुद्धा हायड्रेट कसं राहायचं? जाणून घ्या....
Winter fruit:हिवाळ्यात आपल्याला कमी तहान लागल्याने आपण पाणी कमी पितो, म्हणूनच आपल्या आहारात फळांचा समावेश करणे महत्वाचे आहे ज्यात नैसर्गिक पाण्याचे प्रमाण जास्त असते.
Continues below advertisement
Winter fruit
Continues below advertisement
1/6
सफरचंदांमध्ये जवळजवळ 85% पाणी असतं. त्यामध्ये फायबर आणि मिनरल्सही असतात, जे पचन सुधारतात आणि शरीराला हायड्रेट ठेवतात.
2/6
संत्री हे हिवाळ्यातील फळ आहे आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. हे फळ शरीरातील फ्लुइड लेव्हल राखण्यास मदत करतं आणि त्वचेला डिहायड्रेशनपासून वाचवतं. पण जर तुम्हाला सर्दी किंवा फ्लू असेल तर संत्री कमी प्रमाणात खा.
3/6
हिवाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही खजूर खाऊ शकता. त्यात पाणी, नैसर्गिक साखर, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
4/6
किवी हे पौष्टिक फळ आहे. त्यात इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटॅमिन सी आणि पाणी भरपूर प्रमाणात असतं. ते शरीराला हायड्रेट करण्यास मदत करतं. हिवाळ्यात त्याचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.
5/6
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी द्राक्षे देखील उत्तम पर्याय आहेत. द्राक्षे खाल्ल्याने त्वरित ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो. त्यामध्ये पाणी, ग्लुकोज आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात त्यांचे सेवन अवश्य करा.
Continues below advertisement
6/6
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 22 Nov 2025 12:54 PM (IST)