Fourth Women's Policy : एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे...! मुख्यमंत्र्यांसह दादा, फडणवीस, मुंडे, मंत्रालयात कोणी कोणी नावं बदलली?
आपल्याला जन्मापासून ते आपल्याला मोठे करण्यापर्यंत ज्या माऊलीचा सिंहाचा वाटा आहे तिला तिचं श्रेय देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराषट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी नव्याने राज्याचे चौथे महिला धोरण घोषित केले आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)
राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणामध्ये प्रामुख्याने शासकीय कागदपत्रांमध्ये आईचं नाव समाविष्ट करण्यात यावं हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)
यापुढे प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)
8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचं चौथे महिला धोरण लागू करण्यात आलं. (Photo credit : Facebook/Ajit Pawar)
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात महाराषट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: पासून केली आहे. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)
शासकीय कार्यालयाच्या दालनाबाहेर त्यांनी आपल्या आईच्या नावासोबतच्या पाट्या लावल्या आहेत. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान 'अजित आशाताई अनंतराव पवार' यांना मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील आईच्या नावासोबत पाटी लागली आहे. (Photo credit : Facebook/Ajit Pawar)
धनंजय मुंडे सुद्धा 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' असे नाव आजपासून शासकीय कामकाजामध्ये वापरणार आहे, तसेच या नावाची पाटीदेखील त्यांनी मंत्रालयातील दालनात लावली आहे. (Photo credit : Facebook/Dhananjay Munde)
आता नव्या धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये आपले संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली आहे. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)