बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशभरातून भाविक गर्दी करत असतात.
Continues below advertisement
Tuljapur bogus IAS darshan trap
Continues below advertisement
1/7
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशभरातून भाविक गर्दी करत असतात.
2/7
नववर्षाच्या निमित्ताने आता भाविकांची गर्दी वाढत असून विविध राज्यातून देवदर्शनासाठी, सहकुटुंब सहपरिवार भाविक येत आहेत. त्यामुळे, येथील प्रशासनावरही ताण वाढला आहे.
3/7
तुळजाभवानी मंदिरात आय.ए.एस.अधिकारी असल्याचे सांगून व्हीआयपी दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बोगस आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळालं.
4/7
लोकसेवा आयोगाचे बनावट ओळखपत्र दाखवून कुटुंबीयासह व्हीआयपी दर्शनासाठी निखील परमेश्वरी याने प्रयत्न केला. मात्र, त्याचा बनाव उघडा पडल्यानंतर त्याची कुटुंबीयासह पंचायत झाली.
5/7
व्हीआयपी दर्शनासाठी तोतयागिरी करणाऱ्याचं मंदिर संस्थांनच्या कर्मचाऱ्यांकडून निखिल मदनलाल परमेश्वरी या तोतयाचं पितळ उघड करण्यात आलं.
Continues below advertisement
6/7
बोगस आयडेंटीटी कार्ड दाखवत मंदिरात प्रवेश मिळवणाऱ्या या तोतयाला मंदिर संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनी तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
7/7
दरम्यान, तुळजापूर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असून तो मूळ उत्तर प्रदेशातील असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.
Published at : 23 Dec 2025 06:38 PM (IST)