Tulja Bhavani Temple: तुळजापूर बंदची हाक, तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय
तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. त्यामुळे आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तुळजापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तर काही पुजारी आक्रमक झाले असून, आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद पाहायला मिळत आहे. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी, व्यापारी यांची मागणी आहे.
दर्शन मंडप जागा बदलल्यास व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार असल्याचा आरोप केला जात आहे.
त्यामुळे आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली असून, सकाळपासून मंदिर परिसरात असलेल्या दुकाने बंद ठेवण्यात आल्या आहेत.
त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत असून, या बंदचे चित्र 10 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे.
ळजाभवानी मंदीर संस्थान मंदिराचे विश्वस्त असलेले भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
अराखड्याचे बुधवारी सायंकाळी 5 वाजता तुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण होणार आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत यावर सुचना भाविक, पुजारी, व्यापारी, स्थानिक नागरिक यांना करता येणार आहे.
त्यानंतर 16 ते 17 ऑक्टोबर हे दोन दिवस समक्ष सूचनावर चर्चा होणार आहे. 20 ऑक्टोबर पर्यंत नागरिक व भाविकांनी केलेल्या सुचनावर तांत्रिक व प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल.
त्यानंतर 26 ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अंतीम अहवाल सादर करण्यात येणार आहे. मात्र, याच विकास अराखड्याला विरोध केला जात आहे.