आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय
लाखो भाविक दररोज तिच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात. त्यामुळे गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो
Continues below advertisement
Tuljapur
Continues below advertisement
1/10
तुळजाभवानी मंदिरातील सिंहगाभाऱ्याच्या संवर्धनाच्या कामामुळे भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही.
2/10
मंदिर संस्थानने यासंदर्भात माहिती दिली असून, आता 20 ऑगस्ट 2025 पर्यंत गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
3/10
याआधी 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात आले होते.
4/10
मात्र, संवर्धनाचं काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे दर्शन बंदीचा कालावधी आणखी दहा दिवसांनी वाढवण्यात आला आहे.
5/10
भाविकांना मात्र निराश होण्याचं कारण नाही. देवीचं मुखदर्शन, सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
Continues below advertisement
6/10
देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे. कारण, पुरातत्व खात्याकडून येथे काम सुरू करण्यात आलं आहे.
7/10
तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील 10 दिवस भाविकांना मुखदर्शनच घेता येईल
8/10
20 ऑगस्टनंतर गाभाऱ्यातील नियमित दर्शन पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भाविकांना फक्त बाह्य दर्शनावर समाधान मानावं लागणार आहे.
9/10
तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख कुलदेवी असून, लाखो भाविक दररोज तिच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात.
10/10
गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचाय.
Published at : 06 Aug 2025 07:11 PM (IST)