काळ्या आईची पूजा, गावखेड्यात 'वेळ अमावस्या'; ठाकरेंच्या आमदारानेही केलं वनभोजन
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते, आज गावातील सर्व लहान थोर शेतात जाऊन वन भोजनाचा आनंद लुटतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेळ आमवस्या नावाने सर्वत्र हा शेतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस साजरा केला जातो. धाराशिव येथील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी देखील आपल्या शेतात कटुंबासोबत वेळ अमावस्या साजरी करत वनभोजनाचा आनंद घेतला.
लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्येच्या दिवशीची पूजा महत्त्वाची मानली जाते. आजच्या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा मांडली जाते.
शेतात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, या दिवशी लक्ष्मीची मातीची मूर्ती तयार केली जाते.
कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पूजा केली जाते, शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो, रब्बी हंगामातील गहु, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकांत चर शिंपून 'रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे' अशी प्रार्थना केली जाते.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात भोयर चिंचोली या गावात विकास गायकवाड कुटुंबीयांच्या वतीने महापुरुषाच्या प्रतिमेस अभिवादन करून वेळ अमावस्या साजरी करण्यात आली.
शेतात मांडलेल्या वेळ आमावस्याच्या पूजेत महापुरुषांचे फोटो ठेवण्यात आले होते. लातूर, धाराशिव जिल्ह्यात वेळ अमावस्येचा सण महत्त्वाचा मानला जातो.
संपूर्ण कुटुंब शेतात जात हा उत्सव साजरा करतो. जिल्हाभरातही मोठ्या प्रमाणात आज वेळ आमावस्या साजरी करण्यात आली.