आई राजा उदो उदो... तुळजाभवानी मंदिरातही भाविकांना मिळणार लाडू, कधीपासून सुरुवात, मुहूर्त ठरला
लाडू प्रसाद वाटपासाठीची तारीख निश्चित करण्यात आली. यासाठी आवश्यक नियोजन आणि तयारी सुरूय
Tuljabhavani Temple
1/8
हाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
2/8
'आई राजा उदो उदो...'च्या गजरात दररोज देवीचं दर्शन घेणाऱ्या हजारो भाविकांसाठी आता पुन्हा एकदा लाडू प्रसाद मिळणार आहे.
3/8
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाडू प्रसाद वाटपाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
4/8
२५ जुलैपासून तुळजाभवानी मंदिरात लाडू प्रसाद वाटप सुरू होणार आहे. सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार असून, मंदिर परिसरातच भाविकांना लाडू प्रसाद देण्यात येईल.
5/8
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या लाडू प्रसाद वाटपासाठीची तारीख निश्चित करण्यात आली.
6/8
यासाठी आवश्यक नियोजन आणि तयारी सुरू असून, मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था आखली आहे.
7/8
या निर्णयामुळे तुळजाभवानीच्या भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. देवीचं दर्शन घेतल्यानंतर तिचा लाडू प्रसाद मिळणं, हे भक्तांसाठी एक खास आध्यात्मिक समाधान असतं.
8/8
तुळजापूरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळे लाडू प्रसाद वाटपाची ही सुरुवात हाेणं आनंदाचं ठरलंय
Published at : 23 Jul 2025 06:21 PM (IST)