Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartiki Ekadashi : यंदा आषाढी कार्तिकीला विठुरायाचं भाविकांना दर्शन होणार; कोरोनाचे नियम पाळून वारकरी संप्रदायाची कार्तिकी यात्रा भरणार?
वारकरी संप्रदायाला आषाढी कार्तिकी हा दिवाळी सणाएवढाच महत्वाचा असतो. (Photo tweeted by : @PandharpurVR)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरातून हजारो भाविक या यात्रेसाठी पंढरपूरला येत असतात. (Photo tweeted by : @PandharpurVR)
कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी कार्तिकी यात्रा होऊ शकल्या नाही. (Photo tweeted by : @PandharpurVR)
पण यंदा कोरोनाचे नियम पाळून वारकरी संप्रदायाची कार्तिकी यात्रा भरवण्याचे संकेत मिळाले असून प्रशासन कामाला लागले आहे. (Photo tweeted by : @PandharpurVR)
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे वारकरी संप्रदायाच्या यात्रा काळात पंढरपूरमध्ये संचारबंदी लावण्याची वेळ शासनावर आली होती. (Photo tweeted by : @PandharpurVR)
आता कोरोनाचे संकट कमी झाले असून लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत (Photo tweeted by : @PandharpurVR)
त्यामुळे यंदा 15 नोव्हेंबर रोजी होणार कार्तिकी यात्रेचा सोहळा कोरोनाचे नियम पाळून व्हावा या वारकरी संप्रदायाच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे संकेत मिळाल्याने आता प्रशासन देखील तयारीला लागले आहे . (Photo tweeted by : @PandharpurVR)