Devendra Fadnavis : क्रेनद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माल्यार्पण, नागपुरात जंगी स्वागत

लक्ष्मीनगर चौकात माजी महापौर यांनी अनोख्या पद्धतीने क्रेनद्वारे माल्यार्पण केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यावेळी क्रेनवर नागपूर का मान विदर्भ की शान असा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करण्यात आला.

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या 50 आमदारांच्या गटासोबत युती करून सत्ता स्थापन केल्यानंतर आज प्रथमच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आगमन झाले.
भारतीय जनता पक्षातर्फे विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रथ तयार करण्यात आला होता.
मुंबई येथून मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानाने नागपूर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूरचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यांच्या स्वागतासाठी केवळ नागपुरातीलच नव्हे तर अगदी शेवटच्या टोकावरील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांतून देखील त्यांचे कार्यकर्ते आज सकाळीच विमानतळावर दाखल झाले होते. नंतर हे हजारो कार्यकर्ते विजयी मिरवणुकीत सहभागी झाले.
नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री.गोळवलकर (गुरुजी) यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली. त्यांच्या समवेत आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके उपस्थित होते.
दुपारी 'प्रेस क्लब ऑफ नागपूर'तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माध्यम संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.