राम मंदिराचं बांधकाम नेमकं कधी पूर्ण होणार?
Ram Mandir Ayodhya: येणारं वर्ष हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचं वर्ष असणार आहे. साहजिकच या सगळ्यात अयोध्येतलं राममंदिर हेही केंद्रस्थानी असणार आहे. हे राम मंदिर कधी पूर्ण होणार ?, मंदिराचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय?, आणि या बांधकामाचं गणित लोकसभेच्या टायमिंगशीही जुळणार का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअयोध्येतल्या राम मंदिराचं काम कुठपर्यंत आलं आहे? पुढच्या वर्षी जानेवारीत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार का? मंदिर बांधकामाचं गणित लोकसभेच्या टायमिंगशी जुळणार का ? अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला वेग आलाय.
अमित शाहा यांनी दिलेल्या डेडलाईनला फक्त एक वर्ष उरलं आहे. आणि त्याच अयोध्येतल्या राममंदिराचं काम नेमकं कुठपर्यंत आलं आहे. इतकी वर्षे निवडणुकीचा मुद्दा राहिलेलं हे मंदिर आता 2024 च्या निवडणुकीआधीच भाविकांसाठी खुलं होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. सध्या अयोध्येतली लगबग पाहिली तरी तुम्हाला मंदिराच्या कामाचा वेग कळू शकेल.
सध्या राम मंदिराचं बांधकाम 40 ते 45 टक्के पूर्ण झालं आहे. पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत किमान गर्भगृहाचं काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. 2024 च्या मकर संक्रांतीपासूनच गर्भगृहात रामलल्लांची प्रतिष्ठापना होईल. तसेच भाविकांना दर्शनाची सोय होईल.
मंदिर परिसराचं काम त्यानंतरही चालू राहील, जे 2025 च्या आसपास पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका प्रचंड बहुमतानं जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्यासाठी पुन्हा उत्तर प्रदेशच्याच मार्गानं भाजपला जावं लागणार आहे.
लोकसभेच्या 80 जागा असल्यानं या राज्याचं महत्व सर्वाधिक आहे. त्यात राममंदिर हा मुद्दा नाही ठरला तर नवलच. ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं भूमीपूजन केलं होतं, त्यावेळीच याची झलक मिळाली होती..
ऑक्टोबर 2022 मध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर कामाचा आढावा घेतला होता..त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते.. अयोध्येत सध्या एल अँड टी कंपनीचे 500 कामगार दिवसरात्र या मंदिराच्या कामात व्यस्त आहेत.
दुसरीकडे मुख्य मंदिराच्या नक्षीदार खांबासाठी राजस्थानमध्येही एक युनिट आहे. संपूर्णणे लोकांच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या पैशातून हे मंदिर साकारण्याचा ट्रस्टचा मनोदय आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे.
आता फक्त पाहावं लागेल, की देशाच्या राजकारणात तीन दशकं गाजणाऱ्या या मंदिराचा मुद्दा या मंदिरनिर्मितीनं संपतो की आणखी गाजत राहतो.