उत्तरकाशीतील धाराली गावात ढगफुटी; ढगफुटी म्हणजे नक्की काय जाणून घ्या!

Uttarakhand Cloudburst : 20-30 चौरस किमी क्षेत्रात 1 तासात 100 मिमी किंवा अधिक पाऊस झाला, तर तो क्लाउड बर्स्ट मानला जातो.

Uttarakhand Cloudburst

1/12
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात डोंगरावरून आलेल्या महाप्रलयात अवघ्या 34 सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेले. 4 जणांचा मृत्यू, 50 पेक्षा अधिक बेपत्ता.
2/12
या भयानक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला. अजस्त्र लाटेप्रमाणे पाण्याचा ढिगारा थेट घरांवर आदळला.
3/12
उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस. नाला ओसंडून वाहत होता.
4/12
मंगळवारी दुपारी 1:45 वाजता अचानक पुर आल्याने गाव 34 सेकंदांत पाण्याखाली गेले.
5/12
4 जणांचा मृत्यू, 20 जणांना वाचवले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथक बचाव कार्यात व्यस्त.
6/12
थोड्याच वेळेत कमी क्षेत्रात जोरदार पाऊस. याला ‘क्लाउड बर्स्ट’ म्हणतात. ढग खरोखर फुटत नाहीत.
7/12
20-30 चौरस किमी क्षेत्रात 1 तासात 100 मिमी किंवा अधिक पाऊस झाला, तर तो क्लाउड बर्स्ट मानला जातो.
8/12
1 चौरस किमी क्षेत्रात 10 कोटी लिटरपेक्षा अधिक पाणी 1 तासात पडले, तर ढगफुटी झाली असे मानले जाते.
9/12
मुसळधार पाऊस vs ढगफुटी मधला फरक म्हणजे पाण्याचे प्रमाण व पूर्वानुमान. मुसळधार पावसाचा अंदाज येतो, ढगफुटीचा येत नाही.
10/12
ढगफुटी अचानक होते आणि अत्यंत वेगाने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नुकसान अधिक होते.
11/12
सूर्याच्या उष्णतेने वाफेचे ढग तयार होतात. समुद्रातून आलेले ओले वारे थंड वातावरणात ढग तयार करतात.
12/12
थंड हवामानात ढगात थेंब तयार होतात. थेंब जड झाले की पाऊस पडतो. हेच ढगफुटीमागील मुख्य विज्ञान.
Sponsored Links by Taboola