CM in Satara : आधी हेलिकॉप्टरचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग, मुख्यमंत्री अखेर साताऱ्यात दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे साताऱ्यासाठी हेलिकॉप्टरने रवना झाले. मात्र पाऊस (Rain) आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झालं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde Helicopter) घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या (Mumbai) दिशेने परत फिरलं.
मुंबईमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग (Helicopter Emergency Landing) करण्यात आलं. त्यानंतर हवामान सुधारल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर साताऱ्याच्या (Satara) दिशेनं निघालं.
त्यानंतर मुख्यमंत्री आता अखेर साताऱ्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
पोलीस दलाकडूनही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात दाखल होताच त्यांंचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शंभुराजे देसाई यांनी स्वागत केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवर (Sainik School Satara) उतरवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.
मुख्यमंत्री तेथून पुढे रस्ते मार्गाने दरे गावाकडे (Satara Dare Village) रवाना झाले. हवामान खराब असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर त्यांचा मूळ दरे गावात उतरू शकले नव्हतं. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईला परत गेले होते.
मुंबईमध्ये (Mumbai) हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग (CM Helicopter's Emergency Landing in Mumbai) करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर मुंबईतून पुन्हा साताऱ्याच्या दिशेनं निघाले.
मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर (Satara Sainik School Ground) लँड झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेथून पुढचा प्रवास गाडीने केला, अशी माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी दरे या गावी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री काही दिवस दरे गावात मुक्काम करणार असून या भागातील काही गावातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात ते स्वत: बांबू लागवड करतील.