Chhatrapati Sambhajinagar : एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर छापा; जादूटोण्यासाठीच्या साहित्याचं मोठं घबाड; जनावरांची हाडं, छत्रपती संभाजीनगरात खळबळ
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ मिळून आल्याने खळबळ उडालीय
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar crime news
Continues below advertisement
1/6
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालात महादेवाची पिंड देखील सापडली आहे.
2/6
महाविद्यालयाच्या विद्याथ्यर्थ्यांना एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
3/6
छाप्यात पोलिसांना एक गावठी कट्टा देखील मिळून आला आहे. नियाज नजीर शेख असे एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरचे नाव आहे.
4/6
कटकट गेट भागातील मुजीब कॉलनी भागात तो राहत होता. विशेष म्हणजे आरोपी नियाज हा 2018 मध्ये झालेल्या राजाबाजार दंगलीतील आरोपी आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
5/6
घरात जादूटोण्याच्या साहित्याचा खच पडला असून आरोपीच्या घरात जनावरांची दोन हाडे, कासवाचे वरचे अवरण असलेले हाड, काळ्या रंगाचे कापडी भुताचे मास्क, चामडी हंटर, रसायनाच्या बाटल्या, कवड्याच्या माळा, सिल्व्हर रंगाच्या धातूचे 74 नाणे, गोल्ड रंगाचे 79 नाणे, दोन इंजेक्शन सिरींज, सापडले आहे.
Continues below advertisement
6/6
यासह महादेवाची पिंड असलेले अगरबत्ती स्टँड, काचेच्या 10 रिकाम्या बाटल्या, 9 काळ्या रंगाचे दगडगोटे, काही इलेक्ट्रिक वजन काटे आदी साहित्य मिळून आले.
Published at : 08 Sep 2025 12:05 PM (IST)